सीमा सत्याग्रही मधू आण्णा कणबर्गी यांची निर्दोष मुक्तता...!
बेळगाव, ता. ३१ : सीमालढ्यातील महत्वाचं आणि निष्ठेचं पान म्हणजेच ज्याने जो पर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ घेतली ते मधू आण्णा कणबर्गी यांची आज न्यायालयीन खटल्यात निर्दोष मुक्तता झाली.
लोकसभा निवडणुकीत नोटाचा पर्याय वापरा म्हणून आण्णांनी जाहीर पत्रक छापून ती मराठी माणसात वाटली. या आकसापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पण आज त्यांची निर्दोष मुक्तता झाली. वेगवेगळ्या खटल्यात समिती कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता होतेच आणि त्याचं संपूर्ण श्रेय समितीने वकील महेश बिर्जे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाते. आजची निर्दोष मुक्तता ही विशेष आहे. कारण मधू आण्णा कणबर्गी यांचा सीमालढ्यासाठी निस्वार्थी त्याग मोठा आहे. या खटल्यासाठी ऍड. महेश बिर्जे, ऍड. शंकर पाटील, ऍड. वैभव कुट्रे यानी काम पाहिले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या