उद्यापासून आनंदवाडी आखाड्यात रंगणार मॅटवरील कुस्त्या
बेळगाव, ता. ११ : आनंदवाडी आखाड्यात दोन दिवस मॅटवरील कुस्त्या रंगणार आहेत. प्रथमच गुणांवर आधारित भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी (ता. १३) सुरुवात होणार आहे. रविवारी (ता. १४) सांगता होणार आहे.
मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना यांच्या वतीने प्रतिवर्षी जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले जात असते. बेळगावच्या प्रसिद्ध आनंदवाडी आखाड्यात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बेळगाव केसरी मॅटवरील सदर स्पर्धा महिला व पुरुष गटात तसेच विविध वजनी गटात आयोजित करण्यात आली आहे. तसेच बालकेसरी बेळगाव, महिला बेळगाव केसरी,बेळगाव केसरी किताबासाठी होणाऱ्या स्पर्धेतील विजेत्यांना चांदीची गदा, रोख रक्कम,प्रमाणपत्र व चषकही देण्यात येणार आहे.
प्रथमच राज्यस्तरीय मॅटवरील महिला आणि पुरुषांच्या विविध गटातील स्पर्धा आयोजित करण्यात आल्यामुळे कुस्ती शौकीनांचे बेळगावात होणाऱ्या बेळगाव केसरी आखाड्याकडे लक्ष लागून राहिले आहे.मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने दोन दिवस होणाऱ्या बेळगाव केसरी आखाड्यासाठी जंगी तयारी चालविली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या