संगोळी रायण्णाचा पराक्रम स्फूर्तीदायी
बेळगाव, ता. १२ : ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढणारे संगोळी रायण्णा हे राणी कित्तूर चन्नम्मांचे विश्वासू मानले जात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी संगोळी रायण्णानी बलिदान दिले. संगोळी रायण्णा यांची देशभक्ती तरुण पिढीला प्रेरणादायी असून युवकांनी संगोळी रायण्णा याचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले.
जिल्हा प्रशासन, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या वतीने नंदगड येथील क्रांतिवीर संगोळी रायण्णा प्रतिस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या नंदगड उत्सव २०२४ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार हलगेकर म्हणाले, संगोळी रायान्नानी स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान आणि त्यांचा पराक्रम स्फूर्तीदायी आहे. संगोळी रायण्णा यांची देशभक्ती आणि नि:स्वार्थ सेवा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्मदिवस १५ ऑगस्ट हा आहे, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि २६ जानेवारी हा त्यांचा हुतात्मा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून विशेष आहे.
संगोळी रायण्णा यांच्या स्मृती निमित्ताने नांदेड उत्सव साजरा केला जावा, ही आदर्श वाद्याची मागणी होती. त्यानुसार शासनाने परवानगीही दिली आणि यंदा जिल्हा प्रशासन नंदगड उत्सव साजरा करत आहे. येत्या वर्षभरात नंदगड उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येईल. अशी अपेक्षाही आमदार हलगेकर यांनी व्यक्त केली.
बेळगावचे उपविभागीय अधिकारी शरण नायक, खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड, यांच्यासह तालुका पातळीवरील सर्व अधिकारी आणि नंदगडवासिय बहुसंख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या