"यश ॲटो" तर्फे मोठ्या उत्साहात जिजाऊ जयंती साजरी
बेळगाव, ता. : यश ऑटो कॉलेज रोड बेळगाव आणि शिवसंत संजयजी मोरे यांच्या संयुक्त विद्यमानाने जिजाऊ जयंती शिवालयात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली .यावेळी अध्यक्षस्थानी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण होते .
यावेळी व्यासपीठावर व्याख्याते म्हणून प्रसिद्ध वास्तूविशारद राजेंद्र मुतगेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.ॲड.अमर यळळूकर ,ईश्वर लगाडे ,राम ठोंबरे ,बाजीराव मन्नोळकर , हेमंत भोसले हे मान्यवरही उपस्थित होते .
यावेळी प्रास्ताविक व स्वागत एम के पाटील सर यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली . त्यानंतर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन ॲड.अमर यळळूकर यांच्या हस्ते व श्रीफळ एम वाय घाडी वाढविले.
यावेळी ध्येयमंत्र व प्रेरणा मंत्र सुरुवात करण्यात आली . यावेळी प्रमुख व्याख्याते राजेंद्र मुतगेकर यांनी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना कसे घडविले हे सांगितले .शिवसंत संजयजी मोरे यांनी दिव्यांग असून सामाजिक कार्यकर्ता म्हणून बबन भोबे यांना राजमुद्रा ,रोजनिशी व लेखणी देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ॲड. अमर यळळूकर यांनी आपले विचार मांडले . यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी आपले अध्यक्षीय भाषणात जिजाऊसाहेबांचा आदर्श आत्मसात करावा आणि शिवराय पुन्हा जन्माला यावे. मराठा समाजाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून द्यावे, ही काळाची गरज आहे. यावेळी एम. वाय. घाडी, संजय गुरव, संदीप तरळे , बाजीराव मन्नोळकर, एम के पाटील , नागेश ढेगसकर ,रणजीत चौगुले ,यल्लाप्पा मजूकर , अरुण मोरे , अजित मोरे , विनायक मोरे , यासह यश ॲटोचे सर्व कर्मचारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन अष्टेकर यांनी केले तर शेवटी आभार धनाजीराव मोरे यांनी मानले .


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या