शिष्टमंडळाने मांडल्या"पवारांकडे" सीमावासियांच्या व्यथा
बेळगाव, ता. १६ : निपाणी येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न व सीमा भागातील मराठी जनतेवर कर्नाटक सरकारकडून होणारा अन्याय याबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मंगळवारी ( ता.१६) निवेदन सादर करण्यात आले. यावेळी श्री. पवार यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. बेळगावात सद्या सुरू असलेल्या अन्यायाची माहिती दिली. दरम्यान, आपण या मध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन श्री.पवार यांनी दिले.
निपाणी येथे गेलेल्या शिष्टमंडळात समिती सरचिटणीस मालोजी अष्टेकर माजी महापौर खजिनदार प्रकाश मरगाळे, उमेश पाटील खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई सरचिटणीस आबासाहेब दळवी मध्यवर्ती समितीचे सदस्य श्री गोपाळराव पाटील व पांडुरंग सावंत यांचा समावेश होता.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या