Type Here to Get Search Results !

जिल्हा पंचायतीचे सीईओ म्हणून राहुल शिंदे यांनी पदभार स्विकारला

जिल्हा पंचायतीचे सीईओ म्हणून राहुल शिंदे यांनी पदभार स्विकारला



बेळगाव, ता. १६ : जिल्हा पंचायतीचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राहुल शिंदे यांनी मंगळवारी ( ता.१६) पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा पंचायतीच्या  कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 


विजापूर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यापूर्वी राहुल शिंदे यांनी सेवा बजावली आहे. राहुल शिंदे हे मूळचे बिदरचे असून त्यांनी आयआयटी मुंबई येथून बी.टेक ही पदवी मिळवली आहे. आयएएस २०१८ च्या बॅचचे असून त्यांनी मंगळूर जिल्हा पंचायतमध्ये प्रोबेशनरी कार्यकाळ पूर्ण केला आहे.  त्यांची बेळगाव जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली होती. त्यानुसार त्यांनी
आज बेळगाव जिल्हा पंचायतीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली.  यावेळी पंचायतीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आणि अन्य राजकीय लोकांनी  पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या