Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील कानडी लोकांना लागू केलेल्या योजना रद्द करण्यात येतील ; मंगेश चिवटे

महाराष्ट्रातील कानडी लोकांना लागू केलेल्या योजना रद्द करण्यात येतील ; मंगेश चिवटे


चंदगड, ता. १५ :  सीमा भागातील मराठी भाषिकांना लागू केलेल्या योजनेला जर विरोध होत असेल तर महाराष्ट्रातील कानडी लोकांसाठी लागू केलेल्या योजना देखील रद्द केल्या जातील असा इशारा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष प्रतिनिधी मंगेश चिवटे यांनी दिला आहे. 



गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आरोग्य योजनांना कर्नाटक शासंनासह कन्नड संघटनांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शनिवारी (ता.१३) जिल्हाधिकाऱ्यांनी  आरोग्य योजनांसाठी सुरू केलेल्या सेवा केंद्रांना कुलूप लावण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे  कारवाईही करण्यात आली आहे. परिणामी मराठी भाषिकांतून तीव्र विरोध होत आहे. तसेच माणुसकीच्या दृष्टिकोनातून कर्नाटक सरकारने आरोग्य योजनांना विरोध करू नये अशी मागणी वाढू लागली आहे. 

बेळगाव शहर परिसरातील सेवा केंद्र बंद करण्याची सूचना करण्यात आल्यानंतर याबाबतची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रतिनिधी मंगेश चिवटे यांनी काल रविवारी शहर आणि परिसरातील कार्यकर्त्यांची चंदगड येथे भेट घेतली. येणाऱ्या काळात महाराष्ट्र सरकारकडून कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत याची माहिती त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली.तसेच याबाबत महाराष्ट्रातील खासदार लवकरच आवाज उठवणार आहेत. त्यासंदर्भातील सूचना करण्यात आलेल्या आहेत.कर्नाटकाने आपल्या प्रशासनाला वेळी सूचना देऊन येणाऱ्या काळात वाद वाढू नये याची काळजी घ्यावी. अन्यथा महाराष्ट्र सरकार देखील आवश्यक त्या उपाययोजना करेल असेही चिवटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या