Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी व्याख्यानमालेचा लाभ घेऊन दहावीच्या परीक्षेत यश मिळवावे ; आर एम चौगुले

विद्यार्थ्यांनी व्याख्यानमालेचा लाभ घेऊन दहावीच्या परीक्षेत यश मिळवावे ; आर एम चौगुले


बेळगाव, ता. १५ : मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेऊन दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळवावे. विद्यार्थ्याना करिअरच्या दृष्टीने ढवी हे वर्ष अधिक महत्वाचं असते. आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून अगदी प्रामाणिकपणे अभ्यास करून या परीक्षेत यश संपादन करावे.  असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते आर एम चौगुले यांनी केले.



यावेळी उद्धघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉ.सी. बी. पाटील यांनी मराठी भाषेसाठी अनेक विधायक कार्य करणाऱ्या, सहकार्याच्या भावनेतून नेहमीच खारीचा वाटा उचलणाऱ्या एम.डी.चौगुले प्रतिष्ठानने व्याख्यानमालेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लावण्याचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला असल्याचे सांगितले.

गेल्या सात वर्षांपासून आम्ही मण्णूर येथे कै. एम. डी. चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून  इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करीत आलो आहोत. वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थी एकत्र आल्याने विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक आणि कलागुणांना कक्षा रुंदावण्यास मदत मिळते असेही श्री. चौगले म्हणाले.



सुरुवातीला कै एमडी चौगुले यांच्या प्रतिमेचे पूजन बेळगुंदी साहित्य संमेलनाचे प्रकाश किणेकर यांच्याहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. सी. बी. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या व्याख्यानमालेचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी आर एम चौगुले यांच्याहस्ते उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सहा आठवडे चालणाऱ्या या व्याख्यानमालेच्या पहिल्या रविवारी कन्नड विषयाचे शिक्षक संजीव कोष्टी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कलमेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक वाय के नाईक, एन के कालकुंद्री, भरमा चौगुले, मधू चौगुले, नागेश चौगुले, महेश काकतकर, संदीप डोणकरी, नितीन कदम, हायस्कूलचे शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी तर आभार सुजाता नावगेकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या