Type Here to Get Search Results !

कोल्हापूरात घ्यावी सीमा परिषद ; प्रकाश मरगाळे

कोल्हापूरात घ्यावी सीमा परिषद ; प्रकाश मरगाळे 

बिंदू चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन, समितीचे अन्य नेते उपस्थित

 


कोल्हापूर, ता. १७ : संयुक्त महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बिंदू चौक येथे मराठा महासंघाच्या पुढाकाराने सर्व पक्षीय व समाज संस्था यांच्या वतीने मेणबत्ती प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक  यांनी  गेल्या ६८ वर्षे कर्नाटक सरकारचा अन्याय व अत्याचार व कानडी गुंडाचा हैदोस घालतात याचा पाढा वाचला .शिवसेनेचे विजय देवणे यांनी समन्वयक मंत्री काय करतात असा प्रश्न विचारला. म एकीकरण समितीचे नेताजी जाधव यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बंदी असेल तर कर्नाटकाचे खुलेआम महाराष्ट्रात कसे फिरतात.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी आम्ही पाठीशी आहोत. म ए समितीचे जेष्ठ नेते प्रकाश मरगाळे यांनी कोल्हापूरकरांच्या भरोशावर सीमावाशीय आम्ही आहोत. सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे.असे सांगून त्यांनी कोल्हापूरात सर्वपक्षीय सीमा परिषद घ्यावी.असे आवाहन करून या परिषदेमुळे सीमा प्रश्नांला चालना मिळेल 

स्वागत बबनराव रानगे यांनी केले. शाहिर मिंलींद सावत यांनी महाराष्ट्र गीत म्हटले. यावेळी कोल्हापुरातील अनेक नेते उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या