Type Here to Get Search Results !

सीमा भागातील मराठी पुसण्याचे काम थांबवा ; अन्यथा याचे परिणाम महाराष्ट्रात दिसू लागतील

सीमा भागातील मराठी पुसण्याचे काम थांबवा ; अन्यथा याचे परिणाम महाराष्ट्रात दिसू लागतील 



बेळगाव, ता. १७ : संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना बुधवारी (ता.१७) महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने हुतात्मा चौक येथे अभिवादन करण्यात आले. 



यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मालोजी अष्टेकर म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पोलीस संरक्षणामध्ये कन्नड संघटना मराठी भाषिकांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र पोलीस संरक्षण काढले तर त्यांची ही हिंमत होणार नाही. त्यामुळे कोणीही मराठी माणसांचा नाद करू नये तसेच पोलिसांनी कन्नड संघटना वेळीच आवरावे अन्यथा याचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदारी राहील. कोणाला कन्नड वाढवायचे असेल. तर त्यांनी ते काम जरूर करावे. मात्र सीमा भागातील मराठी पुसण्याचे काम कोणी करत असेल तर मराठी भाषिक शांत बसणार नाहीत. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात असलेल्या जनसमुदायावर अन्याय करायची वृत्ती सोडून. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी.

 मदन बामणे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, समिती नेते रमाकांत कोंडुसकर, ऍड राजाभाऊ पाटील आदींनी हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्प चक्र व पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडे बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोडमार्गे हुतात्मा चौकापर्यंत फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये सहभागी झालेले मराठी भाषिक बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. 

 फेरीमध्ये माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील, नेताजी जाधव, माजी महापौर सरिता पाटील, महेश नाईक, पंढरी परब, किरण गावडे, चंद्रकांत गुंडकल, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, मधूश्री पुजारी, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, बंडू केरवाडकर, महेश टंकसाळी, बी ओ येतोजी, आप्पासाहेब गुरव, युवा समितीचे अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, महेश जुवेकर, ऍड अमर  येळूरकर, मनोहर हलगेकर, सुधा भातकांडे, शिवाजी बोकडे, सतिश पाटील, प्रकाश अष्टेकर, चंद्रकांत कोंडुसकर, सुनिल मुरकुटे, दत्ता जाधव, महादेव पाटील, सागर पाटील, शिवाजी हंगिरगेकर, बापू जाधव, अजित कोकणे, शिवाजी हावळानाचे, सचिन केळवेकर, रामा शिंदोळकर, संतोष कृष्णाचे, विजय हलगेकर, किरण हुद्दार, रोहन लंगरकांडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या