बेळगुंदी भागातील मावळ्यांचे मोहिमेसाठी प्रस्थान
बेळगाव, ता. २४ : रायरेश्वर ते प्रतापगड या गड मोहिमेसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगुंदी विभागाच्या मावळ्यांनी प्रस्थान केले. या गड मोहिमित सुमारे १०० युवकांनी सहभाग घेतला आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आयोजित गड मोहिमेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून प्रस्थान केले. बेळगुंदी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष प्रताप सुतार, उद्योजक प्रसाद बोकडे, शिवनेरी सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक सूर्यकांत चौगुले यांनी पूजन केले. यानंतर ध्येय मंत्र म्हणण्यात आले. महाआरती झाली. या गड मोहिमेत बेळगुंदी, बोकमुर, सोनोली, यळेबैल, राकसकोप, बिजगर्णी, कावळेवाडी, बडस, बेळवट्टी आदी गावातील सुमारे १०० हुन अधिक मुलांनी सहभाग घेतला आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या