वाढदिवसाच्या खर्चातून केले वह्यांचे वाटप
बेळगाव, ता. २७ : वाढदिवसाला लागणाऱ्या खर्चाला फाटा देत ठळकवाडी हायस्कूलचा माजी विद्यार्थी असलेल्या आयुष्य कुमार पाटील यांने गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आपला वाढदिवस आपल्या शाळेतच साजरा केला.
टिळकवाडी येथील ठळकवाडी हायस्कूल चा माजी विद्यार्थी असलेल्या आयुष कुमार पाटील याने आपल्या वाढदिवसाला जो खर्च येतो त्याच रकमेतून शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रारंभी टिळकवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. आर. कुडतुरकर यांनी आयुष्य पाटील याचे गुलाब पुष्प घेऊन स्वागत केले. त्यानंतर टाळ्यांच्या गजरात उपस्थित विद्यार्थ्यांनी आयुष्य याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आयुष्य पाटील यांच्या हस्ते शाळेतील जवळपास 25 गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच -पाच वह्यांचे वाटप करण्यात आले. शेवटी शाळेचे वरिष्ठ क्रीडा शिक्षक विवेक पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या