संगणक ऑपरेटर भरती प्रक्रिया चुकीची
नव्याने प्रक्रिया राबवा ; ग्रामस्थांची मागणी
बेळगाव, ता. १० : ग्राम पंचायतीमध्ये संगणक ऑपरेटरची जागा भरण्यापूर्वी ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात माहिती प्रसिद्ध करण्याचा नियम आहे. पण, पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सर्व नियम डावलून संगणक ऑपरेटर भरती प्रक्रिया राबवली आहे. ही प्रक्रिया चुकीची असून नव्याने कायदेशीर रित्या राबवावी. या मागणीचे निवेदन बेळवट्टीच्या ग्रामस्थांनी बुधवारी ( ता.१०) ग्राम पंचायतीच्या विकास अधिकाऱ्यांना (पी डी ओ) दिले. नव्याने भरती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, ही यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना दिला.
दैवटी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात बेळवट्टी, इनाम बडस, बाकनुर, धामणे (बै) आदी गावांचा समावेश आहे. या ग्राम पंचायतीच्या कार्यालयात कम्प्युटर ऑपरेटर ही जागा रिकामी होती. ही जागा भरण्यासाठी ग्रामपंचायतच्या पीडीओने परस्परित्या आपल्या मर्जीतील व्यक्तीला संगणक ऑपरेटर म्हणून भरती करून घेतले याबाबत कोणत्याही प्रकारचा नोटीस अथवा जाहिरात प्रसिद्ध न करता ही प्रक्रिया राबवण्यात आली याबाबत ग्रामपंचायतीच्या सदस्या नाही विश्वासात घेण्यात आले नाही परिणामी संबंधित भरती प्रक्रियेला ग्रामपंचायतीच्या सदस्यातूनही विरोध दर्शविण्यात आला. मात्र पीडिओनी आपली मनमानी केल्यामुळे सदस्यातूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत लोकातून्ही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नव्याने भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. अन्यता ग्राम पंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी चेतन पाटील, विनोद कांबळे, श्रीधर पाटील, अमित गाडेकर, लक्ष्मण पाटील, प्रकाश नलवडे, आप्पाजी पाटील, प्रणित पाटील, नितीन चौगुले, भरमा गावडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या