Type Here to Get Search Results !

बेळगाव प्रमाणे सांगलीत ही समाजाला काळिमा फासणारी घटना घडली.......!

 

बेळगाव प्रमाणे सांगलीत ही समाजाला काळिमा फासणारी घटना घडली.......!



मुलीला प्रेमप्रकरणातून पळवून न्हेल्याच्या रागातून मुलांच्या वडिलांना विजेच्या खांबाला बांधून घालून केलेल्या मारहाणीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.१७) पहाटे येथील सांगली येथील धनटेक परिसरात घडली. दादासाहेब रामचंद्र चौगुले ( वय ५५ , रा.मांगले) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

शिराळा पोलीसांनी बारा संशयितावर गुन्हा दाखल केला असून यापैकी संशयित सुरेश महादेव पाटील , संजय महादेव पाटील, रविंद्र मधुकर पाटील, संदीप पाडळकर (रा.मांगले) या संशयितांना चौघांना करण्यात आली आहे. याबाबत अटक करण्यात आलेल्या चार संशयितांच्यासह कविता संजय पाटील, पद्दमा सुरेश पाटील, शुभांगी प्रविण पाटील, प्रविण राजाराम पाटील, सनीराज संजय पाटील, संग्रामसिंग भालचंद्र पाटील, सचिन बाबूराव पाटील, अजय अरविंद पाटील, (रा.मांगले) यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली.या मारहाणीत दादासो चौगुले यांचा मृत्यू झाला असल्याचा जबाब मयत दादासाहेब चौगुले यांच्या पत्नी राजश्री चौगुले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.



उर्वरित आठ संशयित आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यात घेणार नाही असा पवित्रा उपस्थित शंभरच्यावर तरुणांनी घेतल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्याजवळ काही वेळ तणावाचे वातावरण होते .

शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार गावातील सुरेश पाटील कुटुंबीय गावाच्या दक्षिणेला असणा-या धनटेकी परिसरात राहतात, त्यांच्या शेजारीच मयत दादासो चौगुले यांचे जनावरांचे शेड व वस्ती आहे .त्यांचा मुलगा गणेश चौगुले रात्री वस्तीवर मुक्कामाला असतो .तो रात्री उशीरा सुरेश पाटील यांच्या कन्येला घेऊन गेला. त्यांच्यात अनेक दिवसापासून प्रेम संबंध होते.मध्यंतरीच्या काळात दादासाहेब चौगुले व सुरेश पाटील यांच्यात चर्चा होऊन विषय थांबवण्यात आला होता.

मात्र गणेश चौगुले याचे व मुलीचे संबंध थांबले न्हवते, त्याच्यातून आज पहाटे त्यांनी पलायन केले. दादासो चौगुले व त्यांची पत्नी आज पहाटे चारच्या सुमारास जनावरांच्या धारा काढण्यासाठी शेडकडे आले होते. त्यावेळी पाटील कुटुंबीयांनी तुमचा मुलगा आमची मुलगी घेवून गेला आहे . ते दोघे कुठे आहेत सांगा असे विचारले त्यावेळी दादासाहेब चौगुले यांनी आम्ही आत्ताच शेडवर आलो आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या