खोटी माहिती देणाऱ्या बुडा अधिकाऱ्यांवर कारवाई करा
बेळगाव, ता. ८ : कणबर्गी येथील बुडाच्या विकास प्रकल्पासाठी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या हितासाठी त्यांना परत कराव्यात. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आणि माजी सैनिकांच्या घरांचे संरक्षण करण्याबरोबरच सरकारासह न्यायालयाला खोटी माहिती देणाऱ्या बुडा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी श्री चांगदेवनगर रहिवासीयांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमावरी (ता.८)
करण्यात आली आहे.
शेतकरी नेते प्रकाश नायक यांच्यासह अन्य मंडळींच्या नेतृत्वाखाली मागणीची निवेदन श्री चांगदेवनगर रहिवासीयांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार करून पुन्हा एकदा सर्वेक्षण करून कोणावरही अन्याय होणार नाही. या पद्धतीने योग्य ती कार्यवाही केली जाईल. असे आश्वासन दिले. निवेदन सादर करतेवेळी प्रभू मुत्त्यन्नावर, महांतेश जरळी, यल्लाप्पा असूदेकर, इराप्पा अगशीमनी, मल्लाप्पा चिक्कलगुड, शिवानंद बुधिगप्पा, आप्पासाहेब हुलीकट्टी आदी शेतकरी व सेवानिवृत्त जवान उपस्थित होते. निवेदन सादर करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोलो भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांसह बुडाच्या निषेधाच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या.
----------


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या