प्लंबिंग कामगाराचा विजेच्या धक्याने जागीच मृत्यू
बेळगाव, ता. ८ : हनुमान नगर येथील एका इमारतीमध्ये प्लंबिंगचे काम करतना कामगाराचा विद्युत वाहिन्यांना स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना सोमवारी ( ता.८) दुपारी तीनच्या सुमारास घडली. मृत पावलेल्या कामगार खानापूर तालुक्यातील वड्डेबैल येथील असून महेश परशराम पाटील (वय 21 वर्षे) असे त्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेळगाव येथील हनुमान नगर येथील मुख्य कंत्राटदार अभिजीत फकीराप्पा शिवयोगीमठ यांच्या अंतर्गत, सब ठेकेदार म्हणून लक्ष्मण मंजळकर राहणार अनगोळ याच्या मार्फत महेश परशराम पाटील हा प्लंबर काम करण्यासाठी बेळगाव हनुमान नगर येथे कामाला जात होता. दुपारी काम करत असताना हातामध्ये असलेल्या ग्राइंडर मशीन मधील विद्युतभारित तार तुटल्याने त्या वाहिन्यांचा थेट हाताला स्पर्श झाला. याप्रकरणी सदर कंत्राटदार लक्ष्मण मंजळकर याच्या विरोधात बेळगाव एपीएमसी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महेश हा वडेबैल येथील परशराम पांडुरंग पाटील यांचा एकुलता एक चिरंजीव असुन तो काही दिवसापासून पुणे येथे प्लंबिंग कामासाठी गेला होता. पण तेथून तो काम सोडून आपल्या गावी आला होता. सद्या तो नंदीहळी येथील आपल्या मामाच्या घरातून बेळगाव येथे कामाला जात होता. आज सुद्धा नेहमीप्रमाणे बेळगाव येथे कामाला गेला होता. काम करत असताना अचानकपणे विद्युत वाहिन्यांचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. त्याच्यावर मंगळवारी ( ता.९) सकाळी १०. वाजता वड्डेबैल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आकस्मित मृत्यू झाल्याने चापगाव परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या