समितीकडून "आदर्श शाळा" पुरस्कारासाठी मागविले अर्ज
बेळगाव, ता. ८ : प्रतिवर्षाप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने "आदर्श शाळा पुरस्कार २०२३-२४" देण्यात येणार आहे. तरी बेळगाव दक्षिण, उत्तर, ग्रामीण, खानापूर आणि यमकनमर्डी या विभागातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्राथमिक शाळांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी खालील दिलेल्या नियमावलीप्रमाणे अर्ज करावेत. असे आवाहन युवा समितीकडून करण्यात आले आहे.
पुरस्कारासाठी नियमावली अशी
१) विविध शैक्षणिक उपक्रम
२) विद्यार्थ्यांच्या पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न
३) शैक्षणिक दर्जा याबाबत समाधानी पालकांचे मनोदय
४) शाळा सुधारणेसाठी राबविलेले विविध उपक्रम.
५) शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे सामाजिक, पर्यावरण पूरक उपक्रम याची माहिती.
तरी संबंधित शाळेतील शिक्षक, शाळा सुधारणा कमिटी यांच्या माध्यमातून या पुरस्कारासाठी १ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात येत आहेत.
संबंधित अर्ज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालय, कावळे होस्टेल टिळकवाडी, बेळगाव येथे स्वीकारले जातील.
अधिक माहितीसाठी संपर्क
अंकुश केसरकर (अध्यक्ष) 9036378115
श्रीकांत कदम (सरचिटणीस) 9611756529
सिद्धार्थ चौगुले (उपाध्यक्ष) 7338097882


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या