वाहन चालकांसाठी शाप ठरणारा हा कायदा शासनाने त्वरित मागे घ्यावा : ट्रक चालक असोसिएशनची मागणी
बेळगाव, ता. १८ : केंद्र सरकारच्या अंतर्गत केलेल्या हिट अँड रन प्रकरणात चालकाला सात लाखाचा दंड आणि दहा वर्षाची शिक्षा ठोकण्याची तरतूद असलेला २०२३ चा हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे. बेळगाव जिल्हा रॅली ड्रायव्हर्स असोसिएशनच्या वतीने बुधवारी (ता.१८) जिल्हाधिकार्यालयासमोर आंदोलन केले. यानंतर जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देऊन आपली मागणी मांडली.
केंद्र सरकारने नुकत्याच पारित केलेल्या भारतीय दंड संहिता 2023 नुसार हिट अँड रन प्रकरणे फौजदारी कायद्यांतर्गत आणून सात लाखाचा दंड आणि चालकांना दहा वर्षे बारा वर्षाची शिक्षा देण्याची तरतूद केली आहे हा कायदा अन्यायकारक असल्याने तो रद्द करण्याची मागणी बेळगाव जिल्हा ट्रक मालक चालक संघटनेने केली आहे वाहन चालकांसाठी शाप ठरणारा हा कायदा शासनाने त्वरित मागे घ्यावा यासाठी आज जिल्हाधिकार्यालय समोर आंदोलने केली चालक संघटनेचे सदस्य बसवराज तडकोड म्हणाले की वाहन चालकांकडे सात लाख रुपये असतील तर कोणीही वाहन चालवण्याच्या व्यवसायात येणार नाही ट्रक चालक मिळेल ते पाणी अन्न खाऊन जगावे लागते हा कायदा अन्यायकारक असल्याने तो केंद्र सरकारने तातडीने मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी मंगेश गुरव यांनी केंद्र सरकारने वाहन चालकांना त्रासदाय करणारा हा कायदा तात्काळमागे घ्यावा सात लाखाचा दंड आणि दहा वर्षाच्या कारावासीस शिक्षा हा कायदा अनाट्य असल्याचा संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी नुमान खानापुरे यांच्यासह बेळगाव ट्रक चालक-मालक असोसिएशनचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या