टिळकवाडी भक्तांकडून प्रभू सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा
बेळगाव, ता. २२ : आगरकर रोड टिळकवाडी येथील श्रीराम भक्त सेवा संघातर्फे अयोध्येतील श्रीरामचंद्र मूर्ती प्रतिषठापनेच्या निमित्ताने आज विविध कार्यक्रमांसह महाप्रसादाचे वाटप करुन सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
अयोध्येतील श्री राम मंदिराचे उद्घाटन आणि प्रभू श्रीरामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठापणे निमित्त श्रीराम भक्त सेवा संघातर्फे रविवारी सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच आज सोमवारी सकाळी प्रथम श्रीरामांची पालखी सेवा पार पडली. दुसरे रेल्वे गेट टिळकवाडी येथील श्री मारुती मंदिरापासून सकाळी 7:30 वाजता या पालखी सेवेला प्रारंभ झाला. श्री मारुती मंदिर येथून रानडे रोड, आगरकर रोड, नेहरू रोड मार्गे पुन्हा आगरकर रोड येथील श्री शिवमंदिर येथे पालखी सेवेची सांगता झाली. त्यानंतर सकाळी 11 वाजता प्रभू श्री रामाच्या मूर्तीचा पूजा विधी पार पडला. या पूजा विधिनंतर दुपारी 1:30 वाजल्यापासून महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सदर महाप्रसादाचा टिळकवाडी आणि परिसरातील शेकडो भाविकांनी लाभ घेतला.
उपरोक्त सर्व उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी युवा नेते व्यंकटेश सरनोबत, नगरसेवक आनंद चव्हाण, किशोर अर्जुनवाडकर, सतेज काळे, ॲड. किरण कुलकर्णी, उमेश चौगुले, राजू वरपे, विशाल राऊत, शेखर बसुर्तेकर विजय मठपती, रोहित बसुर्तेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या