सीमा भागातील संस्थांना अनुदान देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध...
मुबई, ता. २८ : सीमा भागातील संस्थांना अनुदान देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध...साठे प्रबोधिनी कढून सातत्याने पाठपुरावा... सीमा भागातील साहित्यिक व शैक्षणिक संस्थांना महाराष्ट्र शासन बृहन्महाराष्ट्र अनुदान योजनेमार्फत महाराष्ट्र शासन मराठी विभाग व राज्य मराठी विकास संस्था यांच्याकडून आर्थिक अनुदान देण्याची तरतूद लवकरच करण्यात येईल असे आश्वासन विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले ..
मुंबई मधील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये आयोजित केल्या गेलेल्या मराठी विश्व संमेलनामध्ये जाहीर केले.. या संमेलनामध्ये मराठीचा जागर करण्यात आला. जगभरातील व भारतभरातील विविध मराठी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना या संमेलनाला आमंत्रित करण्यात आले होते. बेळगाव मधून गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी चे पदाधिकारी इंद्रजित मोरे, नीला आपटे, प्रसाद सावंत ,हर्षदा सुंठणकर यांनी या संमेलनामध्ये सहभाग घेतला..प्रबोधिनी चे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओऊळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधिनी तर्फे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ,राज्य मराठी विकास संस्था मुंबई, राज्य मराठी भाषा संचनालय व बृहन्महाराष्ट्र मंडळ मुंबई या सर्व पदाधिकाऱ्यांना भेटून सीमा भागातील संस्थांच्यासाठी लवकरात लवकर अनुदान उपलब्ध करून द्यावे असे सुचविण्यात आले...आणि या संमेलनामध्ये माननीय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबद्दलची घोषणा केली. साठे प्रबोधिनीे अनुदान मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नाला लवकरच यश येईल असे दिसत आहे..

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या