Type Here to Get Search Results !

ऑटो समूहाकडून गडकोट मोहीम फत्ते...!

 ऑटो समूहाकडून गडकोट मोहीम फत्ते...!



बेळगाव, ता. ३० : सालाबाद प्रमाणे कॉलेज रोड येथील यश ऑटो समूहाच्यावतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजीत गडकोट मोहिम यशस्वीरित्या उत्साहात पार पडली.




सदर मोहिमेची सुरुवात यश ऑटो, कॉलेज रोड येथून ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर श्री वैद्यनाथ देवस्थान देवरावाडी येथे पूजा व महाआरती करण्यात आली. पुढे महिपाळगड येथे श्री छ. शिवाजी महाराजांच्या अश्रू पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी महिपाळगडचे सरपंच प्रा. रमेश भोसले व भोगण सर यांनी सर्वांचे स्वागत करून तेथील तटबंदी, बुरुज, शिवकालीन विहिरीचे व श्री भवानी मातेच्या मंदिराचे दर्शन घडवून आणले. श्री भवानी मंदिर येथे ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र व महाआरती करण्यात आल्यानंतर मोहीम पुढे प्रतापराव गुजर स्मारकाकडे रवाना झाली. स्मारकाच्या ठिकाणी ध्येय मंत्र व प्रेरणामंत्र म्हणून सात शूर वीरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसंत संजय मोरे यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी केलेल्या पराक्रमाचा सविस्तर इतिहास सांगितला. त्यानंतर मोहीम भुदरगडकडे रवाना झाली. भुदरगड किल्ला बेळगावपासून 100 कि.मी. अंतरावर गारगोटी गावानजीक असून गडाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या गड माथ्यावर प्रशस्त बारामाही पाणी असणारा शिवकालीन तलाव आहे. आणखी एक वैशिष्ट म्हणजे या गडावर शेती करण्यात येते. गडावरील श्री काळभैरव मंदिरमध्ये महाआरती, प्रेरणा मंत्र व ध्येय मंत्र म्हणण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी राजेंद्र मुतगेकर यांनी गडाची सविस्तर माहिती देऊन इतिहास सांगितला.

या गडकोट मोहिमेचे यशस्वी नेतृत्व यश ऑटोच्या संचालक शिवसंत संजय मोरे यांनी केले. याप्रसंगी विनायक मोरे, अजय मोरे, सुभेदार अरुण मोरे, सुभेदार केदारे मोटर, सुभेदार धनाजी मोरे, नागेश ढेगस्कर, प्रसाद दांडगे, अनिल सालगुडे, सोमनाथ मलाई, नारायण कर्विंकोप, शिव संदेश भारतचे ॲड. सुधीर चव्हाण, उद्योगपती महादेवराव चौगुले, राजेंद्र मुतकेकर, अजित यादव, वास्तु विशारद एम. वाय. घाडी, संदीप तरळे, ईश्वर लगाडे, डी. बी. पाटील, रवी पाटील आदी शेकडो शिवभक्त व यश ऑटोचे कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या