जिल्हा शाखासाठी नवीन अध्यक्षांची नियुक्ती
बंगळूर, ता. १६ : राज्य भाजपने जिल्हा शाखासाठी नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी ३९ संघटनात्मक जिल्ह्यांसाठी अध्यक्षांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. बेळगाव शहर अध्यक्षपदी गीता सुतार, बेळगाव ग्रामीणच्या अध्यक्षपदी सुभाष पाटील, तर चिक्कोडीच्या अध्यक्षपदी सतीश अप्पाजीगोळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
रायचूर शहराचे आमदार डॉ. शिवराज पाटील आणि जयनगरचे आमदार सी. के. राममूर्ती यांचीही जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश समन्वयक म्हणून एस. दत्तात्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप राज्य कार्यालय सचिव म्हणून लोकेश अंबेकल्लू यांची आणि सहसचिव म्हणून बीएच विश्वनाथ यांची नियुक्ती केली आहे. माजी आमदार एल. नागेंद्र, सी.एस. निरंजनकुमार आणि अरुणकुमार पुजार यांनाही जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या