Type Here to Get Search Results !

कडकडीत हरताळ पाळा, हुतात्म्यांच्या अभिवादनाला बहुसंख्येने उपस्थित राहा

 कडकडीत हरताळ पाळा, हुतात्म्यांच्या अभिवादनाला बहुसंख्येने उपस्थित राहा



खानापूर, ता. १६ : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने येणाऱ्या उद्या (ता.१७)  हुतात्मा दिनी खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी आपले उद्योग व्यवसाय बंद ठेवून गांभीर्याने  पळावा. यासाठी तालुक्यातील गावांमध्ये जनजागृती करण्यात आली.



 भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येकाच्या बोली भाषेमध्ये राज्य व्यवहार चालावा यासाठी केंद्र सरकारने  भाषावर प्रांत रचना केली आणि यासाठी फजल अली कमिशन ची नियुक्ती करण्यात आली होती, या कमिशनने 16 जानेवारी 1956 ला महाराष्ट्राचा एक मराठी बहुभाषिक असलेला एक मोठा भाग तोडून त्यावेळच्या म्हैसूर प्रांताला जोडून मराठी भाषिकावर अन्याय केला.  या अन्यायाविरोधात मराठी भाषिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी झालेल्या गोळीबारात मराठी भाषिकांनी  आपले प्राण देऊन हुतात्म पत्करले होते.  या विरोधात दरवर्षी १७ जानेवारीला सीमा भागामध्ये मराठी भाषिक आपापले कामधंदे बंद ठेवून हरताळ पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात. 



यावर्षीही खानापूर तालुक्यातील समस्त मराठी भाषिकांनी आपापले उद्योग व्यवसाय बंद ठेवून खानापूर स्टेशन रोड येथील हुतात्मा स्मारकाजवळ बुधवार तारीख १७ जानेवारीला सकाळी दहा वाजता जमावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व मध्यवर्तीचे संस्थापक सदस्य सूर्याजी सहदेव पाटील यांनी केले, यावेळी चापगाव, शिवोली, खानापूर, नंदगड, कारलगा, हलसाल, कापोली या गावात पत्रके वाटून हुतात्मा दिनाची जनजागृती करण्यात आली, यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, संभाजी देसाई, राजू पाटील, दत्तू कुट्रे, भूपाल पाटील, चापगावचे उदय पाटील, अर्जुन पाटील, विजय पाटील, सुभाष पाटील,विलास पाटील,सादिक सनदी, तुकाराम पाटील अल्लेहोळ, शिवोली मधील ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते, कारलगा मधील परशुराम घाडी, तुकाराम  घाडी, बाजीराव घाडी, शांताराम नार्वेकर, रवळु माळकर, हालसाल येथील नागोजी पाटील, मारुती मेरवा, रुक्मणा मेरवा, निवृत्ती मेरवा, मारुती तोरस्कर, शिवाजी मिरवा, भडकू मेरवा, नामदेव कुट्रे, आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या