ग्रामीण पोलिसांकडून जुगार अड्ड्यावर छापा
बेळगाव, ता. ११ : बाची (तालुका बेळगाव) गावाच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. यामध्ये जुगार खेळणाऱ्या 8 जणाना ताब्यात घेण्यात आले असून 58,600/- रु. रक्कम जप्त करण्यात आली आहे. ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त बेळगावी यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबी पोलिसांनी बाची गावच्या हद्दीत जुगार खेळणाऱ्या 8 जणांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 58,600/- सबंधित आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांनी सीसीबी पथकाला ५ हजारांचे बक्षीस घोषीत केले आहे. पोलीस हरीश रामकृष्ण थोरपडे ( अंजनेय नगर) प्रमोदा मधुकार गराडे ( कमता गल्ली), विजय श्रीकांता तारळेकर (रामदेव गल्ली, वडगाव), आयुब मेहबूबा सर्जेखान (खासई गल्ली,बेळगाव), संतोष सिद्राय दम्मणगी (रामदेव गल्ली, कंग्राळी के.एच.) ज्योतिबा वसंत पवार ( रामदेव गल्ली, कंग्राळी के.एच.) असीपा खतालसाभ मुल्ला (कोतवाल गल्ली बेळगाव) नागेश रमेश वागकर (रामदेव गल्ली, वडगाव) अशी नावे आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या