Type Here to Get Search Results !

"न्यू एक्सलंट पॉईंट्स" पुस्तिकेचे प्रकाशन

 "न्यू एक्सलंट पॉईंट्स" पुस्तिकेचे प्रकाशन


 बेळगाव ता. १० : येथील जी एस एस पदवी पूर्व  महाविद्यालयाच्या संगणक विभाग प्रमुख प्रा. सोनिया चिट्टी (गोरल ) यांनी पदवी पूर्व द्वितीय वर्षाच्या (बारावी) संगणक विज्ञान अभ्यासक्रमावर आधारित " न्यू एक्सलंट पॉईंट्स " ही मार्गदर्शक पुस्तिका, संगणक अभ्यासक्रमाबाबत  सखोल माहिती असलेली ही पुस्तिका बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणारी आहे. 



 पुस्तक प्रकाशनाचा सोहळा नुकताच जीएसएस महाविद्यालयामध्ये पार पडला.यावेळी   एस. के. ई. सोसायटीचे व्हाईस चेअरमन  एस वाय प्रभू , निवृत्त   प्राचार्या माधुरी शानभाग, एस के ई सोसायटीचे सदस्य अजय आजगावकर, संदीप तेंडुलकर, जी एस एस पदवी पूर्व कॉलेजचे प्राचार्य एस. एन. देसाई, जी एस एस पदवी कॉलेजचे प्राचार्य बी एल मजूकर, बीबीए कॉलेजचे कोऑर्डिनेटर  एस एस. शिमनगौडर,  बीसीए कॉलेजचे  कोऑर्डिनेटर जीवन बोडस या सर्वांच्या उपस्थितीत प्रा.  सोनिया  चिट्टी  यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

बारावीच्या विद्यार्थ्याना संगणक विज्ञान अभ्यासक्रम अवघड जातो, त्यामुळे बारावीच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. ही समस्या हेरलेल्या प्रा. सोनिया चिट्टीयांनी अभ्यासक्रम आणि इतर भागावर ही पुस्तिका लिहिली आहे. त्यांनी बारावीच्या विज्ञान शाखेच्या संगणक विज्ञान अभ्यासक्रमातील महत्त्वाच्या भागावर सखोल लिखाण केले असून, सोडवलेल्या सहा प्रश्नपत्रिकाही पुस्तिकेत समाविष्ट केल्या आहेत. विज्ञान बारावीच्या विद्यार्थ्यासह बारावी  वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणारी आहे. टिळकवाडी येथील गौरव बुक सेंटर या प्रकाशकांनी ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. लेखिका सोनिया चिट्टी या येळळूरच्या असून त्या जीएसएस पदवीपूर्व   महाविद्यालयात संगणक विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. याबद्दल  प्रा. सोनिया चिट्टी  यांना त्यांची आई निवृत्त  शिक्षिका श्रीमती जानकी चिट्टी व पती प्रा. सी.एम गोरल यांचे प्रोत्साहन लाभले, या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

---------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या