सातवा वेतनचा अहवाल सादर करा, विधान परिषदेत विरोधकांचा आग्रह
बेळगाव, ता. ७ : सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या अहवालाबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या स्वतः उत्तर देतील असे आश्वासन सरकार आणि सभापती बसवराज होरट्टी यांनी दिल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहातील ठिय्या आंदोलन मागे घेतले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा अहवाल अधिवेशनात सादर करा या मागणीसाठी भाजप सदस्यांनी विधान परिषदेत सभापतींसमोर धरणे आंदोलन सुरू केले होते.
या संदर्भात मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी, आम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांची काळजी आहे. आमचे सरकार कटिबद्ध असल्याची भूमिका मांडली. आम्ही चर्चेसाठी आणि तोडग्यासाठी तयार आहोत. आम्ही बोललो तसे करणार आहोत असेही त्यांनी सभागृह बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या