टिप्पर आणि कार यांच्यात भीषण अपघातात
दोघेजण जिवंत जळाले ; दोघेजण गंभीर जखमी
बेळगाव, ता. ७ : देवगिरी ते बंबरगा गावांदरम्यानच्या सर्कलमध्ये टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील 11 वर्षीय तरुणी आणि 26 वर्षीय तरुण जिवंत जळाले तर दोन जण गंभीर जखमी,
काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कंग्राळी गावातील नातेवाईकाचे लग्न आटोपून आपल्या बंबरगा गावाकडे कारने जात असताना कारचा आणि केदनूर गावाकडून भूतरामहट्टी गावाकडे माती वाहून नेणाऱ्या टिप्परचा भीषण अपघात झाला. यावेळी वाहने एकमेकांवर आदळल्याने डिझेलची टाकी फुटून कार व टिप्परने पेट घेतला. व कारमधील दोन जण जिवंत जळाले, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बांबरगा गावातील 26 वर्षीय मोहन मारुती बेळगावकर आणि मच्छे गावातील 11 वर्षीय समिक्षा सागर डेळेकर यांचा कारमध्ये जळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याच गाडीतून प्रवास करणारे महेश बेळगावकर आणि स्नेहा बेळगावकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेचे वृत्त समजताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.
अपघात होताच टिप्पर चालक पळून गेला असून. काकती पीएसआय मंजुनाथ हलकुंद व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दीली असून, काकती पोलीस कसून तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या