पत्रकार रमेश हिरेमठ यांना पितृशोक
मडिवाळय्या बसलिंगय्या हिरेमठ यांचे निधन
बेळगाव, ता. ६ : कागवाड तालुक्यातील मोळे गावचे प्रतिष्ठित नागरिक मडिवाळय्या बसलिंगय्या हिरेमठ (वय 79) यांचे बुधवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कर्ते चिरंजीव, एक विवाहित कन्या, भाऊ, बहीण, जावई व नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता मोळे (ता. कागवाड) या त्यांच्या मूळगावी मडिवाळय्या यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार रमेश हिरेमठ यांचे ते वडील होत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या