''आदर्श'' वर सत्ताधारी गटाचा विजय
बेळगाव, ता. १९ : अनगोळ रोड येथील दि. आदर्श मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीच्या रविवारी (ता. १९ ) झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाने सर्व पंधराही जागा जिंकून विजय मिळवला. पुन्हा आपल्याकडे राखून ठेवली.
सामान्य गटाच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आप्पासाहेब लक्ष्मण गुरव 606, अमरनाथ कृष्णा फगरे 530, अवधूत मुकुंद परब 523, ईश्वर यल्लोजीराव मेलगे 415, दिगंबर मारुती राऊळ 592, नेमिनाथ यल्लाप्पा कंग्राळकर 507, फतेसिंह प्रतापराव मुचंडी 357, लक्ष्मण महादेव शानभाग 434, सातप्पा महादेव जाधव 410 हे विजयी झाले. तर महिला गटातून सौ. ए. ए. साळवी व सौ. अर्चना एन. पाटील, ओबीसी गटातून एन. आर. सनदी, ए. सी. रोकडे व एससी/एसटी गटातून आर. टी. पवार व पी. एस. साळुंखे यांची याआधीच बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडणुकीत एकूण 1511 मतदरांपैकी 767 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या