निष्ठावंत शिवभक्त, सच्चा कार्यकर्ता हरपला
बेळगाव, ता. १९ : शहापूर, भोज गल्ली येथील रहिवाशी, श्रीराम सेना हिंदुस्थानचा प्रमुख कार्यकर्ता अभिषेक पुजारी (वय 26) यांचे हृदविकाराने मंगळवारी (ता.१९ ) निधन झाले. आपल्या मनमिळावू स्वभावाने सर्वच स्तरातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या अभिजीत याच्या जान्याने अनेकांच्या काळजाला चटका लावून जाणारे ठरलं.
शिवकार्यात नेहमीच धडाडीने भाग घेणाऱ्या अभिषेक वाचून भोज गल्लीतील शिवजयंती आता अपुरी वाटणार आहे. शिवभक्त म्हणून ओळख असणाऱ्या अभिने नेहमीच शिवजयंतीच्या काळात घरचे कार्य समजून त्यात हिरीरीने भाग घेत होता. ज्यावेळी बंगळुरु येथे शिव पुतळ्यांची विटंबना झाली. त्यावेळी धर्मवीर संभाजी महाराज चौकात केलेल्या आंदोलनात त्याला अटक झाली आणि 47 दिवसाचा तुरुंगवास भोगला होता. त्याला याविषयी छेडले असता "राजाचे कार्य आणि दादाची साथ आम्हा तरुणांना असेल तर तुरुंगवास आम्हाला पर्यटनासारखा वाटतो" हे त्याचे उद्गगार शिवकार्याविषयी आणि कोंडूस्कर यांच्या विषयी आदर व्यक्त करणारे होते.
श्री दुर्गामाता दौड असो किंवा शिवजयंतीच्या वेळी गल्लीत भगव्या पताका, भगवे झेंडे लाऊन भगवेमय वातावरण करणारा सच्चा मराठा गडी आपल्यातून निघून गेल्याने अनेकांची हृदये हेलावली.
पूर्ण शहापूर भागातील श्रीराम सेना हिंदुस्थानचे कामकाज तो प्रामुख्याने पाहत होता. तिशीचे वय जायचे ते काय? असा आक्रोश बाया बापड्या करत असतानाच, श्री रामसेना हिंदुस्थानची मोत्याची माळ आज निसटली आणि त्यातील एक अनमोल मोती घरगळून गेला ही विषण्णता पुऱ्या श्री रामसेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यात पसरली आहे. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. सायंकाळी शहापूर स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
-------------

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या