रेडक्रॉसच्या आरोग्य तपासणी शिबिराला महिलांचा उस्फुर्त प्रतिसादात
बेळगाव, ता. १८ : केएलई आयुर्वेद हॉस्पिटलच्या प्रसूती तंत्र व स्त्री रोग पदव्युत्तर विभागातर्फे इंडियन रेड क्रॉस सोसायटी (आयआरसीएस) बेळगाव जिल्हा शाखेच्या सहकार्याने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादात मिळाला.
केएलई आयुर्वेद हॉस्पिटल येथे शनिवारी (ता.१६) आयोजित या शिबिरासाठी मुख्य सल्लागार म्हणून गोवा येथील ऊर्जा वेलनेस सेंटरच्या संस्थापिका डॉ. स्नेहा भागवत यांना निमंत्रित करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. भागवत यांच्यासह आयआरसीएस बेळगाव शाखेचे चेअरमन डॉ. सुरेश कुलकर्णी, केएलई आयुर्वेद हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ. सुभाष शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. स्नेहा भागवत म्हणाल्या, अशा पद्धतीची आरोग्य तपासणी शिबिरे महिलांना त्यांच्या कामाच्या व्यस्त वेळापत्रकात स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देण्यास प्रोत्साहित करतात. महिलांची आरोग्य तपासणी सर्दी, किंवा ताप यांच्यासारखी नेहमीप्रमाणे होत नाही. सुदृढतेसाठी महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी केली जाते. ही व्यापक आरोग्य तपासणी लस अद्यतनितकरण आणि भविष्यातील वैद्यकीय अडचणींच्या जोखमीचे मूल्यांकन अधोरेखित करते असे सांगून मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
आयआरसीएस, बेळगावी शाखेचे अध्यक्ष डॉ. सुरेश कुलकर्णी म्हणाले की, आम्ही एका वेगवान जीवनाचा एक भाग आहोत जिथे सहसा वेळ नसतो. आणि प्रत्येक स्त्रीकडे एकाच दिवसात अनेक गोष्टी साध्य करायच्या असता. विशेषत: माता असलेल्या महिलांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असल्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. वैयक्तिक आणि जीवनातील कामांमध्ये जुगलबंदी करताना स्त्रिया सर्वसामान्यतः आपल्या आरोग्याशी तडजोड करतात. निरोगी स्त्रिया निरोगी समाज घडवतात, कारण त्या कुटुंबाचा केंद्रबिंदू असतात. प्राचार्य डॉ. सुहास शेट्टी यांनी यांनी देखील यावेळी समयोचित विचार व्यक्त केले. प्रारंभी डॉ.गिरीजा सानिकोप यांनी शिबिराच्या विषयावर भाष्य केले. आयआरसीएस बेळगाव शाखेच्या कोषाध्यक्ष, डॉ. प्रिया पुराणिक यांनी पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले आणि शेवटी सर्वांचे आभार मानले. आयआरसीएस सचिव डॉ. सुमंथ एस. हिरेमठ, आयआरसीएस ईसी सदस्य विकास कलघटगी आणि इतर स्वयंसेवक उपस्थित होते. महिलांच्या या आरोग्य तपासणी शिबिराचा शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या