Type Here to Get Search Results !

मच्छे येथील ब्रह्मलिंग यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ

 मच्छे येथील ब्रह्मलिंग यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ 



बेळगाव, ता. १९ : मच्छे (तालुका बेळगाव) येथील ब्रह्मलिंग देवस्थान यात्रेला सोमवार (ता.१८) पासून सुरुवात झाली आहे. आज यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळपासून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. सायंकाळी इंगळ्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे.


यात्रा दरवर्षी डिसेंबर महिन्यात साजरी होते. याही वर्षी काल सोमवारी इंगळ्याच्या गाड्यांची सवाद्य यात्रा काढण्यात आली. गावभर फिरून सायंकाळी उशिरा हे गाडे गावाबाहेर निसर्गरम्य परिसरात वसलेल्या ब्रह्मलिंग मंदिराजवळ पोहोचले . आज सकाळी पूजा आवरून ब्रह्मलिंग मंदिराकडून निघालेली पालखी गावभर फिरत असून घरोघरी या पालखीचे पूजन केले जाते. तसेच लहान बालकांना पालखी समोर झोपवले जाते त्यांच्यावरूनही पालखी पुढे जाते तो एक आशीर्वाद असल्याचा समज मच्छे ग्रामस्थांमध्ये आहे.

 दुपारनंतर मुख्य यात्रेस प्रारंभ होणार असून सायंकाळी पाच नंतर ब्रह्मलिंग मंदिरासमोर इंगळ्या होतील. या यात्रेस उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने गावाबाहेर असलेले सर्व मच्छे ग्रामस्थ तसेच महिलावर्ग आणि पै पाहुणे एकत्रित येतात. सायंकाळी गोड जेवण होऊन यात्रेची सांगता होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या