Type Here to Get Search Results !

मराठी विद्यानिकेतचा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न.

 मराठी विद्यानिकेतचा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न



 बेळगाव, ता. १६ :  मराठी विद्यानिकेतनचा क्रीडा महोत्सव शनिवारी (ता.१६)  उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाला मुख्य पाहुण्या  म्हणून एन.आय. एस. जुडो कोच श् रोहिणी पाटील,  ए. एस.आय. श्रीमती वंदना पाटील उपस्थित होत्या. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते  उद्घाटन क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या शिक्षण संयोजक नीला आपटे, मुख्याध्यापक गजानन सावंत, एन. सी उडकेकर उपस्थित होते.

 या उद्घाटन सोहळ्याला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. प्रथमतः पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.. व रंगीबेरंगी फुगे हवेत सोडून उद्घाटन करण्यात आले.. यानंतर शाळेच्या क्रांती, ज्योती, प्रगती व भारती गटाने पथसंचलन करून ध्वजाला व पाहुण्यांना मानवंदना दिली.. यानंतर क्रीडा ज्योती चे मैदानावर आगमन झाले शाळेच्या जिल्हा व राज्यस्तरीय खेळाडूंनी क्रीडा ज्योती चे नेतृत्व केले.. खेळाडू मनाली बराटे हिने सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली.. यानंतर 3 री ते 7 वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी विविध कवायती, डंबेल्स, रिंग व ॲरेबिक डान्स च्या सामुहिक क्रीडा प्रकारांचे सादरीकरण केले. 

 प्रमुख पाहुण्या रोहिणी पाटील यांनी क्रीडा क्षेत्रातील संधी व कशाप्रकारे विद्यार्थ्यांनी शालेय वयापासून तयारी करावी याविषयी सांगितले तर वंदना पाटील यांनी महिला सक्षमीकरण, क्रीडा प्रकारातून महिलांना मिळणाऱ्या विविध क्षेत्रातील संधी.. याविषयी मार्गदर्शन केले..  यानंतर मैदानी खेळांना सुरूवात झाली.. पाहुण्यांची ओळख क्रीडा शिक्षक पूजा संताजी यांनी करून दिली. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी क्रीडा विभागाचे दत्ता पाटील, महेश हगिदळे व सुरेंद्र बेन्नाळकर यांनी प्रयन्त केले. सर्व शिक्षकांनी क्रीडा महोत्सव यशस्वी पणे संपन्न होण्यासाठी परिश्रम घेतले.. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. बी. एम. पाटील यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या