Type Here to Get Search Results !

कायद्याचा अभ्यास करून आशिलांना योग्य तो न्याय मिळवून द्यावे : न्यायाधीश दिनेश कुमार


खानापूर, ता. ३ : तरुण वकिलानी कायद्याचा अभ्यास चांगला करून, आपल्या आशिलांना योग्य तो न्याय मिळवून द्यावात, कष्ट आणि अभ्यास वकिलांच्या यशाचा गमक आहे. त्यासाठी तरुण वकिलांनी कष्ट करून, कायद्याचा चांगला अभ्यास केला पाहिजे. असे प्रतिपादन कर्नाटक उच्च न्यायालयाचे (धारवाड खंडपीठ) ज्येष्ठ न्यायाधीश व बेळगाव जिल्हा एडमिस्ट्रेटिव्ह श्री दिनेश कुमार यांनी केले. 


खानापूर जे एम एफ सी न्यायालयाच्या पाठीमागील बाजूस, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अनूदानातून एक कोटी रूपये खर्चून, नवीन बांधण्यात येणाऱ्या न्यायाधीशांच्या निवास गृह, भूमी पूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने, झालेल्या समारंभात बोलताना वरील प्रतिपादन त्यांनी केले. समारंभाच्या अध्यक्षस्थांनी खानापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ वकील श्री ईश्वर आर घाडी होतें. पुढे बोलताना न्यायाधीश दिनेश कुमार म्हणाले की. धारवाड आणि बेळगाव परिसर निसर्ग संपन्न प्रदेश असल्याने, मला हा परिसर फार आवडतो. त्यासाठी माझ्या निवृत्तीनंतरचे जीवन, या परिसरातच कायमस्वरूपी वास्तव्य करून, आपलं जीवन जगण्याचा, आपण विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश दिनेश कुमार यांच्या पत्नी श्रीमती जयश्री प्रतिनिधी, जिल्हा सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती एम. विजयालक्ष्मी देवी, जिल्हा न्याय कायदा समिती सचिव श्री मुरली मनोहर रेडी,  खानापूर जे एम एफ सी न्यायालयाच्या सीनियर न्यायाधीश श्रीमती झरीना, खानापूर जे एम एफ सी प्रिन्सिपल न्यायाधीश श्री सूर्यनारायण, जे एम एफ सी ॲडिशनल न्यायाधीश वीरेश हिरेमठ आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या