सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक एकत्र
उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरवात
बेळगाव, ता. ३ : उद्या 4 डिसेंबर पासून बेळगावच्या सुवर्ण विधानसौधमध्ये कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे. आज रविवारी विधानसभा अध्यक्ष यु.टी.खादर तसेच विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी सुवर्ण विधानसभेला भेट देऊन तयारीची पाहणी करणार आहेत. दरम्यान बेळगाव अधिवेशनात प्रमुख विरोधी पक्ष असणारा भाजप व त्यांचा मित्र पक्ष निजद यांनी एकत्रितपणे सरकार विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे.
हिवाळी अधिवेशनात खास करून उत्तर कर्नाटकातील समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे विरोधकांनी ठरविले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्यातही सरकारला अपयश आले आहे हा मुद्दा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उपस्थित करून,संयुक्तपणे सरकारला कोंडीत पकडण्याची व्युहरचना विरोधकांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या