Type Here to Get Search Results !

इवल्या इवल्या हातानी दिला मातीला आकार मराठी विद्यानिकेतन बालवाडी विभागातर्फे विविध उपक्रमांचे प्रदर्शन

इवल्या इवल्या हातानी दिला मातीला आकार

मराठी विद्यानिकेतन बालवाडी विभागातर्फे विविध उपक्रमांचे प्रदर्शन

              


बेळगाव, ता. ३ : मराठी विद्यानिकेतन बालवाडी विभागातर्फे  विद्यार्थ्यांनी पहिल्या सत्रांमध्ये केलेल्या  शैक्षणिक उपक्रमांचे, प्रकल्पांचे व विविध हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आल.



या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या वर्षभरातील कामांमध्ये  सहभागी असणाऱ्या व नियमित उपस्थित असणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या  पालकांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये हर्षदा गुंजीकर, स्वयम गौंडाडकर, कैवल्य ताशीलदार, स्वरूप बाळेकुंद्री, कोयना मोदगेकर ,,क्रतिका मासेकर व आहान सावंत या विद्यार्थ्यांचे पालक व मुख्याध्यापक गजानन सावंत ,नारायण उडकेकर, बालवाडी समन्वयक गौरी ओऊळकर आदी उपस्थित होत्या. 

प्रास्ताविक व स्वागत बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर यांनी केले. स्वाती जाधव यांनी प्रकल्प प्रदर्शना मागची संकल्पना स्पष्ट केली. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी मातीची खेळणी, लाकडी वस्तू ,विविध प्रकारची घरे ,पाण्याचे स्त्रोत, जंगले व पशुपक्षी याविषयी मांडणी केली होती. यासाठी त्यांना बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर, शिक्षिका स्वाती जाधव, रेणू सुळकर ,भारती शिराळे, अश्विनी हलगेकर, सुनीता पाटील व वरदा देसाई यांचे  मार्गदर्शन लाभले.हे प्रदर्शन मंगळवार दिनांक 5 डिसेंबर पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता पाटील व आभार वरदा देसाई आणि मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या