Type Here to Get Search Results !

कडोलीत ७ जानेवारीला होणार साहित्याचा जागर

कडोलीत ७ जानेवारीला होणार साहित्याचा जागर




बेळगाव, ता. २७ : सीमाभागात साहित्य संमेलनाची गंगा सुरू केली. त्या मराठी साहित्य संघातर्फे कडोली (तालुका बेळगाव) येथे  ७ जानेवारी २०२४ आयोजन करण्यात आले आहे. या ३९ वे मराठी साहित्य संमेलन विविध चार सत्रात पडणार असून संमेलनाचे  अध्यक्षपदी वारणानगर येथील लेखक व संशोधक प्रा. दिनेश पाटील हे भूषविणार आहेत.

प्रा. पाटील हे वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य आहेत. 'अस्पृश्य जाती', 'दूधपंढरी', आधुनिक भारताचे शिल्पकार महाराजा सयाजीराव गायकवाड, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सुधारणा, सर्जक पालवी, जगावेगळा राजा, सयाजीरावांची ओळख असे त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. अनेक ग्रंथांचे संपादक म्हणून त्यांनी कार्य केले आहे. याबरोबरच त्यांचे अनेक संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

 संमेलन एकूण चार सत्रात होणार असून पहिल्या सत्रात उद्घाटन समारंभ व अध्यक्षीय भाषण होईल. दुसऱ्या सत्रात व्याख्यान, तिसऱ्या सत्रात नवोदितांचे कथाकथन व चौथ्या सत्रात निमंत्रित कवींचे कविसंमेलन होणार आहे. साहित्य संघांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संमेलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली.

 यावेळी प्रा. बाबुराव नेसरकर, सतीश सावंत, अनिल कुट्रे, संघाचे विद्यमान अध्यक्ष अरुण पाटील, स्वागताध्यक्ष शिवराज कालकुंद्रीकर, माजी अध्यक्ष बसवंत शहापूरकर, माजी अध्यक्ष बाबुराव गौंडवाडकर, कार्याध्यक्ष शिवाजी कुट्रे, उपाध्यक्ष भरमाणी डोंगरे, सचिव किशोर पाटील, सहसचिव गिरीधर गौंडवाडकर, खजिनदार विलास बामणे, उपखजिनदार अनिरुद्ध पाटील, सदस्य महादेव चौगुले, किरण पवार, तानाजी कुट्रे, मोहन पाटील, संभाजी पवार, अनिल डंगरले आदी उपस्थित होते.
-----------------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या