राज्यात कोरोना चे तीन बळी ; आरोग्य विभागाचे टेन्शन वाठल
बेंगळूर, ता. २६ : कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून यावेळी कोरोनाचा नवीन उपप्रकार जेए.1 व्हेरिएंटमुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. भारतात जेएन.1 बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारी (ता. २६) 34 नव्या जेएन.1 बाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन रुणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्याच्या शेजारी असलेल्या केरळमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. केरळमध्ये दररोज शेकडो कोरोनाबाधित रुग्ण सापडत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात आज 115 नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात जेएन.1 चे 34 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 20 रुग्ण केवळ बंगळूर.शहरात सापडले आहेत. तर चार रुग्ण म्हैसूर आणि तीन रुग्ण मंड्या येथे सापडले आहेत. रामनगर, बंगळुरू ग्रामीण, कोडगू आणि चामराजनगर मध्ये प्रत्येकी एक जेएन.1 बाधित रुग्ण आढळला आहे. तसेच तीन रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये गेल्या 24 तासांत 115 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच राज्यातील सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,749 वर पोहोचली आहे. देशभरात रविवारी कोव्हिड-19 चे 656 नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच एका रुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. माय गव्हन्मेंट संकेतस्थळावरील माहितीनुसार सद्या देशात 4,054 सक्रीय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक केरळमध्ये आहेत. कर्नाटकमध्ये 3,128 सक्रीय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कोरोना महामारी पुन्हा एकदा झपाट्याने पसरत आहे. रोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की भारतात कोविड -19 चे 412 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, संसर्गाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या 4170 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी 8 वाजता आकडेवारी जाहीर आहे

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या