सुजय सातेरी याची रणजी संघात निवड
बेळगाव, ता. २७ : बेळगावचा अष्टपैलू खेळाडू सुजय संजय सातेरी याची २०२३- २४ सालाचा रणजीत स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हा सांग 16 सदस्याचा असून ५ जानेवारीपासून हुबळी येथे कर्नाटक संघाचा पहिला सामना पंजाब विरुद्ध होणार आहे.
सुजय सातेरी हा मजगाव येथील रहिवासी असून पैलवान संजय सातेरी यांचे चिरंजीव आहे. या अगोदर दीपक चौगुले आणि रोनित मोरे या दोन खेळाडूंची कर्नाटक रणजी संघात निवड झाली होती. यंदा सुजयची निवड झाली असून तो रणजीत संघात खेळणार आहे. सुजय हा कर्नाटक संघाचा दुसरा यष्टीरक्षक फलंदाज आहे. हंगामी सामन्यात कर्नाटक टीम साठी तो खेळणार आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या