Type Here to Get Search Results !

मुद्देमालासह ५५ लाखांची दारू जप्त आखरी खात्याची मोठी कारवाई

 मुद्देमालासह ५५ लाखांची दारू जप्त


आखरी खात्याची मोठी कारवाई



बेळगाव, ता. २२ : काकतीनजीक  अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात मुद्देमालासह सुमारे ५५ लाखांचा बेकायदा दारूसाठा जप्त केला. बेळगावमार्गे मध्यप्रदेशकडे या दारूची वाहतूक सुरू होती. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून ट्रकमध्ये सापडलेली दारू नेमकी आली कुठून याचाही तपास करण्यासाठी अबकारी खात्याकडून हालचाली सुरू केल्या आहेत. 

गोव्यातून २० ते ३० टन दारू जवळच्या आंध्रप्रदेश व तामिळनाडू राज्यातील ट्रकमधून परराज्यात नेण्यात येत होती. रात्रीच्या वेळी एका गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी थांबविण्यात आला होता. बेळगाव मार्गे मशरूमच्या पोत्यांमधून तस्करी होत असलेली बेकायदा दारू अबकारी विभागाने जप्त केली आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना अबकारी
आयुक्त वाय. मंजुनाथ म्हणाले, आज गोव्यातून परराज्यात
बेकायदा दारू वाहतूक करणारा ट्रक पकडून, दारू वाहतुकीचा मोठा प्रयत्न आम्ही हाणून पडला आहे. या अवैध दारू वाहतुकीत अनेकांचा सहभाग आहे. त्यांना पकडण्यासाठी आम्ही ठिकठिकाणी सापळे रचले आहेत. दारू आणि वाहन मिळून ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ६०० बॉक्समध्ये भरून बेकायदा दारू वाहतूक होत असल्याच्या प्राप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगाव अबकारी विभागाने या वर्षभरात बेकायदा दारू वाहतुकी विरोधात केलेल्या कारवाईपैकी ही आणखी एक मोठी कारवाई आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या