25 पोती इंद्रायणी भात जळून खाक
शेतकऱ्याचे मोठे नुकसान, अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद
बेळगाव, ता. २२ : खादरवाडी शिवारात मळणीसाठी ठेवण्यात आलेल्या भाताच्या गंजाना आज्ञाताकडून आग लावून पेटूवन दिल्या. या आगीमध्ये सुमारे 25 पोती भात जळून खाक झाले. आग विजवीण्यासाठी आलेले अग्निशामक दलाचे बम घटनास्थळी पोहोचण्यास अडथळे आल्यामुळे माघारी पाठवण्यात आले. ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष शंकर शिवनगेकर यांचे १ लाखाचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इंद्रायणी व सोनम भाताच्या 3 गंजाना (वळ्याना)अज्ञातांनी आग लागल्याने पिकाचे नुकसान झाले आहे.या घटनेत शेतकऱ्याचे 25 पोती भात जळून खाक झाले असून ऐन दुष्काळात 75 हजाराचे नुकसान झाले आहे. घटना स्थळी अग्निशामक दलास पाचारण करण्यात आलेपण घटनास्थळी जाण्यास अडथळे आल्यामुळे आग न विझवताच फायर ब्रिगेड च्या गाड्याना आग न विझवता माघारी परतावे लागले. या ठिकाणी पोलीस व पिरनवाडी ग्रामपंचायत तलाठी यांनी पंचनामा केला अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या