चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आं. रा. महिला उद्योजकता दिन साजरा
बेळगाव, ता. ६ : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे 'आंतरराष्ट्रीय महिला उद्योजकता दिन' उद्यमबाग येथे नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.
उद्यमबाग येथील चेंबर ऑफ कॉमर्सच्या रावसाहेब गोगटे सभागृहात शनिवारी ( ता.२) आयोजित या आंतरराष्ट्रीय महिला उद्योजकता दिन कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू (हलगेकर) उपस्थित होत्या. याप्रसंगी महिला उद्योजक म्हणून आपापल्या क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या रोहिणी गोगटे, साबिहा रफिक हिरानी, वाणी शशिकांत सिदनाळ, विजया नितीन मुथानी आणि मीनाक्षी सदानंद मिश्रीकोटी यांचा यथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी सर्व सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (बीसीसीआय) पदाधिकारी, सदस्य, निमंत्रित, हितचिंतक आणि शहरातील बहुसंख्य महिला उद्योजिका उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या