'भाजपा' च्या 10 खासदारांनी दिला राजीनामा
नवी दिल्ली, ता. ६ : पाच राज्यांमधील विधासभा निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं. मात्र अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी अनेक खासदारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामागील कारण स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी भारतीय जनता पार्टीच्या ज्या खासदारांनी विधानसभेची निवडणूक जिंकली आहे त्यांचा समावेश आहे. एकूण 10 खासदारांनी राजीनामा दिला आहे.
अचानक राजीनामा देणाऱ्या खासदारांमध्ये प्रामुख्याने नरेंद्र सिंह तोमर, प्रह्लाद पटेल, राजवर्धन सिंह राठौर, दीया कुमारी, रीति पाठक, अरुण साहू, राकेश सिंह, उदय प्रताप सिंह, गोमती साह यांचा समावेश आहे. या सर्वांनी लोकसभेच्या अध्यक्षांची भेट घेऊन खासदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच किरोडी लाल मीणा यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या