Type Here to Get Search Results !

पाचव्या राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धेचे बेळगावात आयोजन


पाचव्या राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धेचे बेळगावात आयोजन 



बेळगाव, ता. १३ : बेलगाम डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्यावतीने आणि अखिल कर्नाटक स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्या सहयोगाने बेळगाव नगरीत पाचव्या राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शिव बसव नगर येथील जी एन एम सी कॉलेज नजीकच्या केपीटीसीएल समुदाय भावनात गुरुवार दिनांक 28 आणि शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर अशी दोन दिवस ही स्पर्धा घेतली जाणार आहे.

7 वर्षाखालील, 8 ते 9 वर्षे, 10 ते 11 वर्षे, 12 ते 13 वर्षे, 14 ते 15 वर्षे,  16 ते 17 वर्षे, 18 ते 19 वर्षे आणि 29 वर्षांवरील अशा 8 वयोगटात मुले आणि मुलींच्या विभागात कटा आणि कुमिटे अशा प्रकारात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. 

स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या दोन विजेत्यांना अनुक्रमे सुवर्णपदक व रौप्य पदक देऊन गौरविण्यात येणार असून तिसऱ्या क्रमांकाचे कांस्यपदक दोघांना  देण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरावर खुल्या कुमिटे प्रकारात  चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताब विजेत्या (मुले-मुली) कराटेपटूला 5 हजार रुपये रोख तर स्पर्धेतील खुल्या गटात कुमिटे प्रकारात बाजी मारणाऱ्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियनला (मुले-मुली) 10 हजार रुपये रोख आणि मानाचा किताब देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 


स्पर्धकाला कटा आणि कुमिटे या दोन्ही स्पर्धा प्रकारात भाग घेणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर, मोबाईल क्रमांक - 9945121398, सर चिटणीस जितेंद्र काकतीकर, मोबाईल क्रमांक- 9845474643 अथवा खजिनदार दीपक काकतीकर, मोबाईल क्रमांक 7795474645 या यावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या