Type Here to Get Search Results !

समितीकडून तहसीलदारांसह अन्य खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन

समितीकडून तहसीलदारांसह अन्य खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन


खानापूर, ता, ११ : खानापूर – अनमोड व्हाया हेम्माडगा रस्ता नव्याने पुनर्बांधणी करने व सद्या सुरू असलेली अवजड वाहतुकीला निर्बंध आणावेत. या मागणीचे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तहसीलदारांना सोमवारी (ता.11)  निवेदन दिले. जर येत्या काळामध्ये निवेदनाची दखल न घेतल्यास, पुढील आठवड्यामध्ये मणतूर्गे क्रॉस येथे रस्ता रोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तहसीलदारांच्या अनुपस्थितीत उप तहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांनी निवेदन स्वीकारले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन श्री. कोलकर यांनी दिले. यानंतर  पोलीस खाते व पीडब्ल्यूडी कार्यालयाला देण्यात आली.  सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जितेंद्र कांबळे,  पोलीस खात्याचे अधिकारी एस.के. खोत यांनी निवेदन स्वीकारले.

उप तहसीलदारांना निवेदन देताना माजी आमदार दिगंबरराव पाटील, गोपाळराव देसाई, आबासाहेब दळवी, पदाधिकारी व कार्यकर्ते समितीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खानापूर – अनमोड व्हाया हेम्माडगा या रस्त्यावरून गोव्याला जाणारी अवजड व इतर वाहतुकीत, गेल्या पाच वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे, हा रस्ता पुर्णपणे उध्वस्त झालेला आहे. त्यामुळे या  रस्त्यावरून दळण- वळणासाठी दुचाकीवरुन जाता-येताना पन्नास खेड्यातील जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवार दि. 22 ऑगस्ट 2022 रोजी खानापूरचे तत्कालीन तहसिलदार श्री. प्रवीण जैन, व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता श्री हलगी यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु आजतागायत या रस्त्याचे काम झालेले नाही.

खानापूर-रामनगर गोवा हा रस्ता नव्याने करण्यासाठी वाहतुकीसाठी बंद केला होता.  यामुळे गोव्याला जाणारी वाहतूक खानापूर-हेम्माङगा व्हाया अनमोड मार्गे पाच वर्षापासून सुरु आहे. हा रस्ता अरुंद तसेच जंगलातून जात असल्यामुळे, फक्त या भागातील  50 गावातील जनतेसाठी वाहतुकीसाठी करण्यात आलेला आहे. परंतू अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने गोव्याला जाणारी अवजड वाहतुक या रस्त्यावरून चालुच आहे. त्यामुळे हा रस्ता पुर्णपणे उखडून गेला असून, या भागातील 50 गावच्या लोकांना रस्ता नाहीसा झाला आहे. या रस्त्यावरुन साधी दुचाकीही चालविणे कठीण झाले आहे. वारंवार छोट्या-मोठ्या अपघातांची मालिका सुरुच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकान्यांना विनंत्या करुनही कोणतीच दखल घेतली नाही. तरी हा रस्ता लवकरात लवकर नव्याने करणे तसेच आपण संबंधित खात्याच्या अधिकान्यांना योग्य त्या सुचना देऊन तात्काळ अवजड वाहतुक बंद करावीत असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी निवेदन देताना माजी आमदार दिगंबरराव पाटील, समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, निरंजनसिंह सरदेसाई , रणजीत पाटील, सजीव पाटील, पांडुरंग सावंत, गोपाळराव पाटील, राजाराम देसाई, बाळासाहेब शेलार, जयसिंगराव पाटील, रमेश  देसाई, मोहन गुरव, डॉ. एल. एच. पाटील, भीमसेन करंबळकर, महात्रू धबाले,  शिवाजी गावकर, बी.  बी. पाटील, अजित वसंतराव पाटील, अनंत मष्णू पाटील, गोपाल लक्ष्मण हेबाळकर, पुंडलिक लाटगांवकर, शामाणी नागाप्पा मजगावकर, डी एम भोसले, ए आर मुतगेकर, व समितीचे कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या