विश्व विजेत्याचा माज म्हणावा की मस्ती
मुंबई - क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर करोडो भारतीयांचे स्वप्न तुटले. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकप आपल्या नावावर केला तर भारताची तिसर्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरायची संधी हुकली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाचा जल्लोष सुरु आहे. मात्र, त्या जल्लोषादरम्यान पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने आपल्या इन्स्टा अकाऊंटला शेअर केलेल्या मिचेल मार्शच्या एका फोटोमुळे भारतीय क्रिकेटप्रेमी प्रचंड संतापले आहेत.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मिचेलने वर्ल्डकप ट्रॉफी आपल्या पायाखाली ठेवली आहे आणि तो सोफ्यावर दिमाखात हातात बिअरची बाटली घेऊन बसला आहे. इतक्या मेहनतीने मिळवलेल्या ट्रॉफीला अशा प्रकारे मानसन्मान न देणं भारतीयांना मात्र रुचलेलं नाही. ट्रॉफीचा आदर करण्याचा सल्ला त्याला भारतीयांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या