Type Here to Get Search Results !

महामेळावा संदर्भात मध्यवर्तीची बैठक

महामेळावा संदर्भात मध्यवर्तीची बैठक बुधवारी


बेळगाव : कर्नाटक सरकारच्या बेळगावातील दिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक येत्या बुधवार दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता बोलावण्यात आली आहे.

बेळगाव येथे येत्या डिसेंबर महिन्यात कर्नाटकचे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. सदर महामेळाव्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक बुधवार दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. तरी सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.

--------------‐------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या