बेळगाव, ता. १७ : गाडेमार्ग, शहापूर येथील रहिवासी आणि बेळगाव महानगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी अर्जुन शट्टप्पा देमट्टी (वय 63) यांचे आज शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मनपाच्या आरोग्य विभागात अनेक वर्षे सेवा बजावल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी मनपा कर्मचारी संघटना, मनपा कर्मचारी सोसायटी अध्यक्षपदाची धुरा ही सांभाळली होती. बेळगाव परिसरातील सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. . त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले,विवाहित कन्या, एक भाऊ असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या