Type Here to Get Search Results !

एकाची आत्महत्या....

तोपिनकट्टीत एकाची आत्महत्या

नातेवाईकांकडून खून झाल्याची  पोलिसांकडे तक्रार



खानापूर : तोपिनकट्टी येथील नागरिक मारुती कृष्णा तहसीलदार (वय 56)  यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून  आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी ( ता.१६) सकाळी उघडकीस आली.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरूवारी सकाळी  तोपिनकट्टी गावातील नागरिक भात कापण्यासाठी आपल्या शेताकडे जात असताना, मारुती कृष्णा तसीलदार हे शेतातील झाडाला गळफास लावून घेतलेल्या स्थितीत दिसले असता, नागरिकांनी याची कल्पना त्यांच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर सदर मृत व्यक्तीची पत्नी व नातेवाईक त्याठिकाणी आले. एकंदर फास घेतलेली परीस्थिती पहातां मृत व्यक्तीच्या पत्नीला व नातेवाईकांना संशय आला. त्यामुळे मृताची पत्नी रेणुका मारूती तसीलदार (वय 45) हिने आपल्या नवऱ्याचा खून झाला असल्याची तक्रार खानापूर पोलिसात दिली आहे. पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत.


मारुती कृष्णा तसीलदार हे मूळ तोपिनकट्टी गावचे रहिवासी असुन, फार वर्षापासून परमेश्वर नगर यळ्ळूर या ठिकाणी सध्या वास्तव्यास आहेत. तोपिनकट्टी येथे त्यांची वडिलोपार्जित जमीन असुन येळूर वरून तोपिनकट्टी ला ये जा करून ते आपली शेती करत असल्याचे समजते. परंतू शेतीत त्यांना व्यवस्थित वाटणी न मिळाल्याने ते काळजीत होते असे समजते. काल बुधवारी रात्री गावातील एका हॉटेलात चहा पिऊन, भडंग बांधून घेतला व शेताकडे जातो असे सांगून ते गेले होते. असे समजते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या