बेळगुंदी ग्रामपंचायतीत कनकदास जयंती साजरी
बेळगाव, ता. ३० : बेळगुंदी येथे विविध ठिकाणी कनकदास जयंती मोठया उत्सवात साजरी करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे आज बेळगुंदी ग्रामपंचायत कार्यालयात कनकदास जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी ग्रामपंचायतीचे कर्मचारी रवींद्र नुली यांनी प्रास्ताविक केले. तर प्रमोद पाटील यांनी स्वागत केले. यानंतर उपाध्यक्ष गीता ढेकोळकर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष प्रताप सुतार यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी श्री. नुली यांनी कनकदास यांच्या कार्याची माहिती सदस्यांना पटवून दिली. यावेळी कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य हेमा हदगल, निगुंली चव्हाण, दीपा लोहार बाळकृष्ण लोहार, महादेव पाटील, रवळू पाटील आदीसह ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या